पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी शांताबाई जगताप यांच्या हस्ते पार पडला. यंदा साखर कारखान्याने १४ ते १५ लाख मे. टनाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती माळेगांव कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप यांनी दिली. गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांच्या आडसाली ऊस तोडणीला प्राधान्याने तोड देणार आहोत. चांगल्या पावसाचा ऊस उत्पादक सभासदांना फायदा होणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केला.
माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला राज्यात उच्चांकी ३६३६ रुपये असा दर दिला आहे. शिवाय, कारखाना कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस दिल्याबद्दल बारामती तालुका साखर कामगार सभेच्यावतीने चेअरमन जगताप व मा. व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानदेव बुरुंगले, संतोष जाधव, सुरेश देवकाते, अशोक तावरे, इंद्रसेन आटोळे, दशरथ राऊत, प्रकाश देवकाते, राजेंद्र तावरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासोा पाटील तावरे, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मंगेश जगताप, निशिकांत निकम, दत्तात्रय येळे, विलास कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.