कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने काटकसरीचा सभासद व कर्मचारी हिताचा कारभार केला असून, आगामी काळात तो कर्जमुक्त असेल, असे प्रतिपादन जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील- सडोलीकर यांनी केले. ‘भोगावती’च्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर देवाळे येथे आयोजित सभासदांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी विष्णू हरी पाटील होते.
यावेळी अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, पी. डी. धुंदरे, वसंतराव पाटील, एम. आर. पाटील- कुरुकलीकर, सुरेश कुसाळे, बंडोपंत वाडकर, मारुती पाटील, एकनाथ भोसले, के. बी. पाटील, बाळासाहेब खाडे, उदयानीदेवी साळुंखे, शिवाजीराव पाटील, संजयसिंह पाटील, संचालक, आदी उपस्थित होते.