कोल्हापूर : भरारी पथकाने हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची अचानक तपासणी केली. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्यात चार वजनकाटे बसवण्यात आले आहेत. यामध्ये ३० टनी – २, ६० टनी- १ आणि ८० टनी एका वजनकाट्याचा समावेश आहे. कारखान्याचे हे वजनकाटे अचूक असल्याचे पथकाला दिसून आले. वजन मापे खात्याने त्याबाबतचे प्रमाणपत्र कारखान्याला दिले.
वजनकाटे तपासणी वेळी भरारी पथकाचे प्रमुख कागल वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक ए. टी. चव्हाण, मंडल अधिकारी पी. पी. गुरव, एस. बी. सोनवणे, पोलीस हवालदार बी. डी. पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रतिनिधी रशिद मुल्ला, आप्पासो रामचंद्र कदम, सुरेश सदाशिव पाटील, टेक्निकल विभागाचे जनरल मॅनेजर टेक्निकल सर्जेराव पाटील, मुख्य शेती अधिकारी जी. एस. मगदूम, डेप्युटी चीफ इंजिनिअर मोरबाळे, केनयार्ड सुपरवायझर ए. डी. राऊत आदींसह ऊस वाहतूकदार उपस्थित होते.