पीलीभीत : ऊस वजन करण्यासाठी साखर कारखान्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मुलभूत सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश ऊस तथा साखर आयुक्तांनी डीसीओंना दिले आहेत. याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर ऊसाची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर पट्टी लावणेही अनिवार्य केले आहे.
एलएच साखर कारखाना पिलिभीत, किसान सहकारी साखर कारखाना पूरनपूर, सहकारी साखर कारखाना बिसलपूर, बजाज हिंदूस्थान लिमिडेट बरखेडाकडून गाळप सुरू आहे. २०२१-२२ च्या या हंगाात शेतकरी कडाक्याच्या थंडीत ऊस पुरवठा करीत आहेत. याबाबत ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. कोविडपासून बचावासाठी सॅनिटायझर, पाणी व इतर व्यवस्था करावी, केन यार्डमध्ये गरम पाणी शेतकऱ्यांना द्यावे अशाही सूचना आहेत. धुके असल्याने शेतकऱ्यांनी सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावावे अशा सूचना आहेत. याबाबत डीसीओ जितेंद्र कुमार मिश्र यांनी सांगितले की, या आदेशांचे पालन सुरू आहे. याबाबत सर्वांना निर्देश दिले आहेत.