नवी दिल्ली : श्री मंडावा प्रभाकर राव यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी श्री आदित्य झुनझुनवाला यांच्याकडून इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तर धामपूर बायो ऑरगॅनिक्स लिमिटेड (DBO) चे व्यवस्थापकीय संचालक श्री.गौतम गोयल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्री. राव आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील आहेत. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी M.Sc (कृषी) मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
राव यांनी एनएसएल ग्रुपला नव्या उंचीवर नेले…
श्री.राव यांनी 1982 मध्ये एनएसएल ग्रुप आणि एनएसएल शुगर्स लिमिटेड (हैदराबाद) च्या ग्रुप चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली आणि एनएसएल ग्रुप ऑफ कंपनीजला बियाणे, कापड, साखर आदी विविध क्षेत्रात नव्या उंचीवर नेले. त्यांच्या आतापर्यंतच्या शानदार कारकिर्दीत श्री. राव यांनी कापूस, ऊस, तांदूळ, मका, भाजीपाला आदी क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी भारतीय आणि जागतिक MNCs मधील सहयोग आणि भागीदारीचे एका नवीन युगाचा पाया रचला. ज्यामुळे उद्योगाची वाढ आणि शेतकऱ्यांच्या नफ्यातही वाढ झाली.
राव यांचा देशाच्या विकासात मोठा हातभार…
विविध व्यवसायांचे व्यवस्थापन करण्याव्यतिरिक्त, श्री राव विविध उद्योग संस्थांमध्ये सक्रियपणे भाग घेतात. ते संस्थापक सदस्य असलेल्या काही संस्था अशा – नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया (NSAI) आणि ICAR, राष्ट्रीय कृषी शिक्षण मान्यता मंडळ (NAEAB), FICCI – आंध्र प्रदेश. पोस्ट स्टेट कौन्सिल, सीईओ क्लब्स इंडिया (हैदराबाद चॅप्टर), वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरण (PPVFR प्राधिकरण), कृषी समिती, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कापूस सल्लागार मंडळ, वस्त्रोद्योग समिती, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार. केंद्रीय बियाणे समिती (कृषी मंत्रालय), आंतरराष्ट्रीय बियाणे महासंघ (ISF) बोर्ड, आचार्य एन.जी. रंगा कृषी विद्यापीठ (हैदराबाद), केंद्रीय बियाणे प्रमाणन मंडळ, आंध्र प्रदेश सीड्समन असोसिएशन आदी संस्थामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. एवढेच नाही तर श्री राव यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. NSL शुगर्स लिमिटेड कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये साखर कारखानदारीत अग्रेसर आहे.
गौतम गोयल हे धामपूर बायो ऑरगॅनिक्स लिमिटेड (DBO) चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 01.12.2017 रोजी धामपूर शुगर मिलमधून धामपूर बायो ऑरगॅनिक्स डिमर्ज करण्यात आले. 1 एप्रिल 2021, आणि विलीनीकरणापूर्वी ते धामपूर शुगर मिल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. DBO उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 30,000 TPD च्या एकत्रित क्षमतेसह तीन साखर कारखान्यांचे संचालन करते आणि समूह कच्च्या आणि शुद्ध साखरेसह विविध प्रकारच्या साखरेचे उत्पादन करतो. सोबतच उच्च दर्जाच्या फार्मा ग्रेड साखर उत्पादनावर विशेष लक्ष देतो. DBO ची डिस्टिलरी क्षमता 300 KLPD पेक्षा जास्त आहे आणि अंदाजे 90 MW नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्माण करते. गौतम गोयल यांना साखर उत्पादन व्यवसायाचा तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि धामपूर समूहातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे.
गौतम गोयल यांच्या पुढाकारामुळे धामपूर समूह हा देशातील सर्वात मोठा बायोमास आधारित अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी काही सर्वात आधुनिक आणि कार्यक्षम सहनिर्मिती युनिट्स स्थापन केली आहेत. भारतातील पहिल्या परिष्कृत साखर उत्पादन प्रक्रियेची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्यासाठी ते जबाबदार होते. गौतम गोयल हे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे माजी अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन (ISEC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
गोयल यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान…
गौतम गोयल यांनी DBO च्या विविध CSR उपक्रम सक्रियपणे राबविले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शाळांची स्थापना केली. जेथे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक AV तंत्रज्ञान आणि स्मार्ट क्लासरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोफत फिरत्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. कौशल्य विकासाद्वारे महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविले जात आहे. गौतम गोयल हे एक प्रसिद्ध खेळाडूही आहेत. त्यांनी राष्ट्रीय आंतरराज्य स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. गोयल हे एक उत्कृष्ट गोल्फर देखील आहेत.
‘इस्मा’ची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (नवी दिल्ली) येथे झाली. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने आपल्या नावाचा विस्तार केला असून यापुढे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) असे नाव असेल. श्री संजीव चोप्रा, IAS – सचिव, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सभेला उपस्थित वरिष्ठ सरकारी अधिकारी, असोसिएशनचे सदस्य, साखर आणि जैव-ऊर्जा उद्योगाशी संबधित घटक आणि व्यापारी यांना मार्गदर्शन केले. चोप्रा यांनी आपल्या भाषणात भारताच्या ऊर्जा संक्रमण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये साखर उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी साखर उद्योगाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.