15 जूनपर्यंत चालू शकतो मंसूरपूर साखर कारखाना

मुजफ्फरनगर :जिल्हयातील मंसूरपुर साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2019-20 मध्ये 15 जून पर्यंत ऊस चालू शकतो. ऊसाच्या अधिकतेमुळे खतौली आणि मोरना साखर कारखाने दहा जूनपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या कारखान्यांनी पाच जूनमध्ये गाळप संपण्याबाबत सांगितले होते. 

ऊस उत्पादनामध्ये रिकार्ड केल्यामुळे जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सतत वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कारखाान्यांच्या अपेक्षेपेक्षा ऊस होत आहे. तितावी कारखान्याने 28 मार्चला गाळप हंगाम संपल्याचे सांगितले होते. पण शेवटी इतका ऊस आला की कारखाना 6 जून च्या रात्री बंद करावा लागला. खतौली आणि मोरना कारखान्याने पाच जूनला हंगाम संपणार असल्याचे सांगितले, पण आता हे दोन्हीही कारखाने दहा जूनपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. मंसूरपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम 15 जूनपूर्वी संपणार नाही. जिल्हा ऊस अधिकारी आरडी द्विवेदी यांनी सांगितले की, जोपर्यंत शेतात ऊस आहे तोपर्यंत क्षेत्रातील कारखाने गाळप करतील. ऊस शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थीतीत अडचणीत आणले जाणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here