रशियाच्या कच्चा तेलावर अनेक देश अवलंबून

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. अलिकडेच या किमती १४० डॉलर प्रती बॅकरजवळ पोहोचल्या. मात्र, नंतर किमती थोड्या उतरल्या. आता हा दर १११ डॉलर प्रती बॅरलवर आहे. मात्र, हे दर पु्न्हा वाढतील अशी शक्यता आहे. कारण विविध देश युक्रेन संकटानंतर रशियाला प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. २०१९मधील आकडेवारीनुसार अनेक देशांनी रशियाकडून तेलाचे आयात केली आहे. तो जगातील कच्च्या तेलाचा दुसरा बडा निर्यातदार देश आहे.

२०१९च्या यादीनुसार सौदी अरेबिया ($145bn), रशिया ($123bn), इराक ($73.8bn), कॅनडा ($67.8bn) आणि यूएस ($61.9bn) हे पाच टॉपचे तेल निर्यातदार देश आहेत. या आकडेवारीनुसार अनेक देशांनी रशियाकडून कच्चे तेल आयात केले आहे. यामध्ये चीनने ३३.७ अब्ज डॉलर मूल्याचे २७.३ टक्के तेल खरेदी केले आहे. तर भारताने १.११ अब्ज डॉलर मुल्याचे ०.९ टक्के तेलाची आयात केली आहे. नेदरलँड, जर्मनी, दक्षिण कोरिया, बेलारुस, पोलंड, इटली, फिनलंड, तुर्कस्थान, जपान, यूएस, स्लोवाकिया, हंगेरी, लिथुआनिया, चेकिया, बल्गेरिया, रोमानिया, यूके, भारत, ग्रीस, फ्रान्स, स्वीडन, सर्बिया, क्रोएशिया, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, डेन्मार्क, लातविया, थायलंड, न्यूझिलंड, नॉर्वे, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अजरबैजान, ऑस्ट्रिया, फिलिपाइन्स, म्यानमार, क्यूबा, कुराकाओ, कोलंबिया, संयुक्त अरब अमिरात आणि उर्वरीत आशिया या देशांनी रशियाकडून तेल आयात केले आहे. यूएस, सौदी अरब, रशिया, कॅनडा आणि चीन हे देश बडे उत्पादक देश आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here