“भविष्यात साखर कारखान्यांना कर्ज देताना अनेक अडचणी येणार”

कोल्हापूर, ता. 3, मे; जिल्हा बँकेने कर्ज दिलेल्या ११ कारखान्यांपैकी आठ कारखान्यांची गेल्या तीन महिन्यात साखर विक्री झालेली नाही. त्यामुळे बँका अडचणीत येणार आहेत. साखर उद्योगापुढे अभूतपूर्व संकट निर्माण झाल्याने पुढील साखर हंगामात किती कारखाने सुरु होतील की नाही याबाबत शंका कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

मुश्रीफ म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील 11 कारखान्यांना 128 कोटी सॉफ्ट लोन दिले आहे. आठ कारखान्यांची साखर विक्री न झाल्याने बँकेला 125 ते 150 कोटी रुपये कर्जापोटी दिलेली रक्कम साखर विक्रीतून मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात साखर कारखान्यांना कर्ज देताना अनेक अडचणी येणार आहेत. पुढील हंगामात अनेक कारखाने सुरू होणार नाहीत अशी परिस्थिती आहे.

देशात गेल्या हंगामातील 107 लाख टन शिल्लक आहे. यावर्षी 328 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दोन वर्षांतील 435 लाख साखर शिल्लक आहे. देशात वर्षाला 235 लाख टन साखर लागते. 30 ते 32 लाख टन साखरेची निर्यात होईल. तरीही 110 ते 115 लाख टन साखर शिल्लक राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here