छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अद्याप काही कारखान्यांकडून गाळप सुरु असून विभागात आतापर्यंत उसाचे 2.53 कोटी टनापेक्षा जास्त गाळप झाले असून लातूरचा जिल्हा उताऱ्यात विभागात सर्वात पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसते. मराठवाड्यातील ६१ कारखान्यांपैकी ४४ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपला असून कारखान्यांनी आजवर दोन कोटी ५३ लाख ८ हजार ३७५ टन उसाचे गाळप करत दोन कोटी ४२ लाख ७१ हजार ८६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. उताऱ्यात बीड जिल्ह्यातील कारखाने पिछाडीवर आहेत.
यंदा गाळप हंगामामध्ये सहभागी झालेल्या ६१ कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील १४, छत्रपती संभाजीनगरमधील ६, जालन्यातील ५, बीड व परभणीतील प्रत्येकी ७, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६ व लातूरमधील ११ कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांपैकी धाराशिवमधील १२, छत्रपती संभाजीनगरमधील ५, जालन्यातील १, बीड व परभणीतील प्रत्येकी ६, हिंगोलीतील ४, नांदेड व लातूरमधील प्रत्येकी ५ कारखान्यांचा गाळात आटोपला आहे. जिल्हानिहाय कारखान्यांचा सरासरी साखर उतारा असा : धाराशिव ९.१९, छत्रपती संभाजीनगर ९.७४, जालना ९.५, बीड ८.२२, परभणी ९.९, हिंगोली ९.९४, नांदेड ९.९५, लातूर १०.६५