सांगली : निवृत्त कामगारांचे पुढील आयुष्य सुखी, समाधानी व आरोग्यदायी जावो. सर्वांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःची व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कारखान्याच्या व संपूर्ण हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या उभारणीमध्ये व प्रगतीमध्ये कामगारांचा मोलाचा सहभाग आहे असे प्रतिपादन क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष व हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी केले. येथे २८ व हुतात्मा किसन अहिर विद्यालयातील ०२, अशा एकूण ३० सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार नायकवडी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या सत्कार समारंभात कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागत केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी आभार मानले. यावेळी वीरधवल नायकवडी, चीफ केमिस्ट बी. एस. माने, वित्त व्यवस्थापक एस. बी. बोराटे, टाईम किपर दीपक नायकवडी, शिवाजी पाटील कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैभव नायकवडी यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.