मारूती कारखान्याचे यंदा ३ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन गणपतराव बाजुळगे

लातूर : सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणारे नेतृत्व आहे. बंद पडलेले अनेक कारखाने चालू करण्याची चावी ही फक्त त्यांच्याकडेच आहे. त्यांच्यामुळे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना सुरु होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परवड थांबली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे यांनी केले. मारुती महाराज कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्याने चालू हंगामात ३ लाख मेट्रिक टन गाळपाचे उदिष्ट असल्याचे त्यांनी सागितले. चेअरमन बाजुळगे म्हणाले कि, मागील काही काळात कारखाना सात वर्षे बंद राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बंद पडलेला कारखाना पुनर्जीवित केला.

बाजूळगे म्हणाले की, बंद कारखान्याचा उभारणीसाठी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी भरीव मदत केली. गेल्या हंगामात कारखान्याने एक लाख ३० हजार १०२.५१७ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. सरासरी उतारा ११.०१ टक्के असून उसास प्रती टन २,५५५ रुपये दर देण्यात आला आहे. ७७ गावांच्या कार्यक्षेत्रात या कारखान्याचे ७ हजार २३८ सभासद आहेत असे सांगण्यात आले.

कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी प्रास्ताविक केले. सभेस व्हा. चेअरमन शाम भोसले, संचालक सचिन पाटील, प्रदिप चव्हाण, विलास पाटील, अनिल झिरमीरे, हरिशंद्र यादव, सुरेश पवार, गितेश शिंदे, प्रवीण कोपरकर, औसा बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकर राचट्टे, सुभाष जाधव, महेंद्र भादेकर, सुनिल उटगे, राजेंद्र भोसले, बी. व्ही. मोरे, सचिन देशमुख उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here