लातूर : मारुती महाराज साखर कारखाना चालू गाळप हंगामात २,५०० रुपये पहिली उच्चल देणार आहे. आगामी काळात मारुती महाराज साखर कारखाना अग्रगण्य श्रेणीत आणू, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. औसा तालुक्यातील चिंचोली सोन येथील उदयसिंह देशमुख परिवाराच्यावतीने दिवाळी निमित्त आयोजित सुसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
सुवर्णाताई देशमुख, माजी आमदार ॲड. त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ॲड. श्रीपतराव काकडे, श्रीशैल्य कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, विजयश्री देशमुख आदी उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, उदयसिंह देशमुख यांनी चिंचोली येथील रस्ते व गावाच्या विकास कामासाठी प्रयत्न केला आहे. यापुढेही ते करतील. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाला, कामांना गती दिली आहे. उदयसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक केले. साक्षी देशमुख अभय देशमुख, यशराज देशमुख, राजेश देशमुख, आदित्य देशमुख, उपसरपंच शाहूराज चव्हाण, चैत्यन्य शिंदे आदी उपस्थित होते. अमरसिंह सूर्यवंशी – भोसले, सुग्रीव लोंढे, राजेंद्र भोसले, राजेंद्र मोरे, पृथ्वीराज शिरसाठ, धनराज भोसले, अविनाश नागाळे, सचिन दाताळ, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.