मारुतीकडून भारतातील पहिल्या Flex Fuel prototype कारचे अनावरण

नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियाने दिल्लीत वॅगन आर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप मॉडेल (Wagon R Flex Fuel prototype model) चे सादरीकरण केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २० टक्के इथेनॉल आणि ८५ टक्के पेट्रोल यांदरम्यान कोणत्याही इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालण्यासाठी डिझाइन तयार करण्यात आलेली भारतातील पहिल्या मास-सेगमेंटमधील फ्लेक्स-फ्युएल कारचे अनावरण करण्यात आले. या कारला सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, जपानच्या मदतीने मारुती सुझुकीच्या इंजिनीअर्सकडून स्थानिक रुपात डिझाइन आणि विकसित करण्यात आले आहे.

वॅगन आर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप वाहनात एक प्रगत इंजिन आहे, ते विशेष रुपात उच्च इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा वापर करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. मारुती सुझुकीच्या निवेदनानुसार, इजिनला उच्च इथेनॉल मिश्रणात (E२०-E८५) अनुकूल बनविण्यासाठी, कोल्ड स्टार्ट असिस्टसाठी हिटेड फ्युएल रेल आणि इथेनॉलच्या टक्क्याचे प्रमाण जाणून घेण्यासाठी इथेनॉल सेन्सरसारख्या नव्या इंधन प्रणाली तंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. नव्या नियमांसोबत ताळमेळ घालताना, मारुती सुझुकीने BSVI टप्पा- II उत्सर्जन मानदंडाचे पालन करण्यासाठी इंजिन व्यवस्थापन प्रणाली धोरण आणि उत्सर्जन नियंत्रण प्रणाली विकसित केली आहे. मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक आणि सीईओ हिसाशी टिकूची यांनी सांगितले की, मारुती सुझुकीने देशात तेल आयातीवरील बोजा कमी करण्यासाठी आणि पर्यावरण सुधारण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टासोबत स्वतःला जोडून घेतले आहे. भारतात स्थानिक रुपात डिझाइन आणि विकसित वॅगन आर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप वाहन भारत सरकारच्या मेक इन इंडिया प्रयत्नांना मजबूत करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here