मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये शुक्रवारी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पर्यटन आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र काम करण्याबाबत सहमती झाली. यामध्ये ऊस उत्पादन आणि त्याच्या उत्पदनाच्या तांत्रिक विकासाबाबत लवकरच मोठा निर्णय होईल. मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले की, ऊसाची शेती करण्यासाठी उत्तर प्रदेशचे लोक मॉरिशसला गेले. ऊस संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यूपी-मॉरीशस यांनी एकत्र काम केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसेल. यासोबतच त्यांनी आयुष क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला. तीन दिवसांच्या काशी यात्रेच्या अंतिम दिवशी शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ताज हॉटेलच्या दरबार हॉलमध्ये ४५ मिनीटे विविध मुद्यांवर चर्चा केली. ऊस शएती आणि त्यांच्या उत्पादनांच्या विकासाबाबत दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन्ही देशांतील संशोधन शेतांपर्यंत पोहोचवले जाईल. याशिवाय दोन्ही सरकारी यंत्रणा, व्यावसायिकांशी चर्चा होईल. पंतप्रधान प्रविंद्र म्हणाले, भारताचे मॉरिशससोबत भावनिक नाते आहे. दोन्ही देश विकासाची प्रक्रिया अधिक पुढे नेतील. साखरेची अर्थव्यवस्था हा मॉरिशसचा मूळ स्त्रोत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, युपीत ११९ कारखाने सुरू आहेत. दोन्ही देश एकत्र काम करतील. तेव्हाच ऊसापासून इथेनॉल तयार करून त्याचा वापर पेट्रोल, डिझेलमध्ये केला जाईल. उसापासून इथेनॉलसाठी उत्तर प्रदेशात प्लांट स्थापन झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा मोठा स्त्रोत असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.