मेरठ, उत्तर प्रदेश: साखर कारखाना मवानाचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल आणि कारखान्याचे धुराडे पेटेल. कारखाना व्यवस्थापनाने याची तयारी सुरु केली आहे. बहुसंख्य ऊस केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. याबरोबरच नंगलामल साखर कारखानाही नोव्हेंबरपासून गाळप सुरु करेल.
शेतकरी संघटनेकडून साखर कारखान्याचा गाळप हंगाम लवकरच सुरु करण्याच्या मागणीबाबत एसडीएम कमलेश गोयल यांना निवेदन देण्यात आले होते. हे पाहता, कारखाना व्यवस्थापनाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गाळप हंगामाबाबत युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. 150 ऊस खरेदी केंद्र तयार झाले आहेत.
साखर कारखाना परिसरामध्ये जवळपास 202 गावांतून ऊस पुरवठा होतो. कारखाना क्षेत्रात 158 ऊस सेंटर स्थापित केले जातात. बहुसंख्य शेतकरी थेट कारखान्यामध्ये ऊस घालतात. तयारी मध्ये आतापर्यंत 150 सेंटर कारखान्याकडून स्थापन करण्यात आले आहेत. ऊस सेंटर दुरुस्त करण्याबरोबर साखर कारखाना केनयार्डची स्वच्छताही करण्यात आली आहे.
साखर कारखाना मवाना शिवाय नंगलामल साखर कारखान्याचाही गाळप हंगाम नोव्हेंंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु होत आहे. साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळेल. कारण शेतकरी, कारखाना सुरु न झाल्यामुळे नाइलाजाने गुर्हाळांमध्ये ऊस घालत आहेत.
मवाना साखर कारखान्याचे अतिरिक्त ऊस महाव्यवस्थापक व प्रशासकीय अधिकारी प्रमोद बलियान म्हणाले की, साखर कारखाना नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरु करेल. कारखान्याच्या ऊस विभागाने याची जवळपास सर्व तायारी केली आहे. एकूण 158 ऊस सेंटर स्थापन झाले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत 150 खरेदी केंद्र लावण्यात आले आहेत. गेल्या हंगामातील 76 टक्के ऊसाचे पैसे देण्यात आले आहेत. 30 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण पैसे दिले जातील. नंगलामल साखर कारखानाही नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु होईल. केनयार्ड मध्ये आल्यावर शेतकर्यांना सॅनिटाइज केले जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.