मेरठ : गळीत हंगाम २०२१-२२ चा प्रारंभ झाल्यानंतर साखर उत्पादनात मवाना साखर कारखाना अग्रेसर आहे. सात ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एक लाख क्विंटलहून अधिक साखर उत्पादन मवाना कारखान्याने केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहर आणि इतर कारखान्यांमध्ये साखर उत्पादन सुरू आहे. मात्र, मवाना कारखाना साखर उत्पादनात अग्रेसर आहे. मवाना कारखान्याकडूनही ऊस बिले वेळेवर दिली जात आहेत.
दिपावलीनंतर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कारखान्याना ऊस पुरवठा केला जात आहे. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्यांत सुरू असलेल्या उत्पादनात मवाना कारखाना अग्रेसर आहे. आतापर्यंत एक लाख २१ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. आगामी काळातही साखर उत्पादन अधिक होण्याची अपेक्षा आहे.