मवाना : मवाना शुगर वर्क्सकडून गेल्या गळीत हंगामातील थकीत ७५ कोटी रुपयांची ऊस बिले सप्टेंबर महिन्यात दिली जाणार आहेत. २०२१ नंतर पहिल्यांदाच कारखाना अशा पद्धतीने गळीत हंगाम सुरू होण्यापू्र्वी पैसे देणार आहे. गेल्या दहा वर्षात मवाना साखर कारखान्याने आपली ऊस थकबाकी कारखाना सुरू झाल्यानंतर तीन महिन्यानंतर अदा केली होती.
मवाना शुगर वर्क्सने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये २०१.५६ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. त्यापोटी त्यांना ६४६ कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. मवाना कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना थोडे – थोडे ऊस बिल अदा करते. कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बिले थकीत राहतात. तर आसपासचे कारखाने आपली ऊस बिले त्वरीत देतात. कारखान्याचे वरिष्ठ ऊस महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, मवाना कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना ६४६ कोटी रुपयांच्या ऊस बिलांपैकी ५७१ कोटी रुपये दिले आहेत. कारखान्याने ८८ टक्के ऊस बिले दिली असून सद्यस्थितीत कारखान्यावर ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. नवा गळीत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. गेल्या दहा वर्षांपासून कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्यावर तीन महिन्यांनी ऊस बिले देत होता असे बालियान म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link