मवाना/दौराला : मवाना साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामातील उसाचे १२ ते १७ नोव्हेंबर २०२० पर्यंतचे बिल १९.७० कोटी रुपये अदा केले आहे. कारखान्याने यावर्षी २२ जानेवारीपर्यंत ८७.७८ क्विंटल उसाचे गाळप केले आहे. हे गाळप गेल्यावर्षीपेक्षा ७.३८ लाख क्विंटल अधिक आहे. शेतकऱ्यांनी गळीताबाबत एसएमएसद्वारे सूचना आल्यावरच तोडणी करावी. विक्री केंद्रांवर आधीच ऊस तोडून देऊ नये असे आवाहन कारखान्याच्या ऊस आणि प्रशासन विभागाचे वरिष्ठ जनरल मॅनेजर प्रमोद बालियन यांनी केले आहे.
दरम्यान, दौराला साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंतची ऊस बिले अदा केली आहेत. साखर कारखान्याने संबंधीत समितीकडे बिलाचे अॅडव्हान्स दिले आहे. यााबाबत कारखान्याचे जनरल मॅनेजर कुमार खाटियान यांनी सांगितले की, साखर कारखाना ऊस बिल अदा करण्याबाबत परिसरात अव्वल क्रमांकावर आहे. शनिवारपर्यंत साखर कारखान्याने १० ते १५ डिसेंबरअखेर खरेदी केलेल्या उसापोटी २४.१५ कोटी रुपयांचे बिल अदा केले आहे. कारखान्याचे सचिव प्रदीप कुमार यांनी सांगितले की, कारखाना लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे. कारखान्याने आतापर्यंत चालू गळीत हंगामातील १६१.२१ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. आणि ९४.५१ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.