युपी: मवाना कारखान्याकडून ५०.४६ कोटींची ऊस बिले अदा

मवाना : मवाना साखर कारखान्याने नवा गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये शुक्रवारी १८ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी ५०.४६ कोटी रुपये संबंधीत समित्यांना पाठवले आहेत. सहकारी ऊस समिती, मवानाचे सचिव नरेश कुमार यांन सांगितले की, ही ऊस बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जातील. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १६ मार्चअखेर मवाना कारखान्याने एकूण १५१.०७ लाख क्विंटल ऊस गाळप केले आहे. शेतकऱ्यांना मवाना कारखान्याने ४६२ कोटी रुपये अदा केले आहेत.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी विभागातील सर्व शेतकऱ्यांना तोडणीचा एसएमएस आल्यावर ऊस तोडावा असे आवाहन केले आहे. कारखान्याच्या गेटवर आणि खरेदी केंद्रांमध्ये साफ, स्वच्छ उसाचा पुरवठा करावा असे सांगितले आहे. वसंत ऋतुमधील ऊस लागवडीत ०११८, को १५०२३ आणि कोएल १४२०१ या उसाची लागवड करावी, केंद्रांवर आधीच ऊस पुरवठा करू नये, अशा उसाला कारखाना जबाबदार राहिल असे आवाहनही कारखान्याने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here