मेरठ : मवाना साखर कारखान्याने २०२२-२३ या नवीन गळीत हंगामामध्ये २० डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीतील सुमारे ५०.४४ कोटी रुपयांची ऊस बिले संबंधित समित्यांना पाठवली आहेत.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मवाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १३ जानेवारीपर्यंत एकूण ८०.५७ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत एकूण २२६ कोटी रुपयांची उस बिले अदा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना साखर कारखान्याचे ऊस आणि प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी एसएमएस मिळाल्यानंतरच ऊस तोडणी करावी. साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रांवर आणि कारखान्याच्या गेटवर स्वच्छ तसेच ताज्या उसाचा पुरवठा करावा, असे आवाहन केले आहे.