सांगली : वाळवा तालुक्यातील शेणे येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ बाळासाो पाटील व त्यांचा मुलगा जितेंद्र यांनी माळरानात उसातून चांगले उत्पन्न काढून पाटील यांनी उच्चांक नोंदवला आहे. ६० गुंठ्यात म्हणजे दीड एकरात २१५ टन उसाचे उत्पन्न काढले. ठिबक सिंचनचा वापर करून पाण्याचे नियोजन केल्याने उसाची वाढ चांगली झाली. उसाची पूर्ण वाढ होण्यासाठी १७ महिन्यांचा कालावधी लागला. ऊस पाहण्यासाठी तोडणी दरम्यान शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
जगन्नाथ व जितेंद्र पाटील यांनी १४ जून २०२२ रोजी ८६०३२ या जातीच्या उसाची पाचफुटी सरी सोडून कांडी पद्धतीने लागण केली होती. या उसाला सरासरी ४५ ते ५२ कांड्या तयार झाल्या होत्या. एका कांडीची लांबी सहा ते सात इंच होती. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खत, लिंबोळी पेंड, जिवाणू खतांचा वापर त्यांनी केला. भारती ग्रीन टेकची जिवाणू खते, रॉयल केमिकलचे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांनी वापरले. परिणामी उसाची उगवण चांगली झाली. उसाची पूर्ण वाढ होण्यासाठी १७ महिन्यांचा कालावधी लागला. ऊस पाहण्यासाठी तोडणी दरम्यान शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.