कोल्हापूर : अथणी शुगर लिमिटेडच्या भुदरगड युनिटने गेल्या ८६ दिवसांत २, ४८, ७५१ मे. टन गाळप केले आहे. सरासरी ११.३५ उताऱ्याने ,८०,१६० क्विटल साखर उत्पादित झाल्याची माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. युनिटद्वारे २०२३-२४ हंगामातील १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले विनाकपात एकरकमी ३२०० रुपये टन याप्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत असे ते म्हणाले.
मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील म्हणाले की, कारखान्यातर्फे पंधरवड्याची ऊस बिले वेळेवर ऊस उत्पादकांच्या नावावर जमा केली जातील. आतापर्यंत १५ जानेवारीपर्यंतची तोडणी वाहतुकीची बिलेही जमा केली आहेत. यंदा कारखान्याचा गळीत हंगाम उत्तमरीत्या सुरू आहे. कारखान्याने योग्य नियोजन केले आहे. व्यवस्थापनाने आजपर्यंत झालेल्या सर्व हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा नेहमी विचार केला आहे. यावेळी डे. चीफ केमिस्ट प्रकाश हेद्रे, शेती अधिकारी राजाराम आमते, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब देसाई, डे. चीफ अकाउंटंट जमीर मकानदार, कन्हैया गोरे आदी उपस्थित होते.