नवी दिल्ली : यावर्षी मे महिन्यात झालेल्या पावसाने गेल्या अनेक वर्षांचा, दशकांचा उच्चांक मोडला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) याबाबत आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की,यावर्षी मे महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला. गेल्या १२१ वर्षात दुसऱ्यांदा इतका पाऊस झाला आहे. सलग दोनदा आलेली चक्रीवादळे आणि पाश्चात्य परिस्थितीचा हा परिणाम आहे.
आयएमडीने सांगितले की, भारतात या वर्षी मे महिन्यात सरासरी अधिक तापमान ३४.१८ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. १९०१ नंतर चौथ्यांदा हे सर्वात कमी तापमान आहे. १९७७ नंतर हे सर्वात कमी तापमान आहे. त्यापूर्वी ३३.८४ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. मे महिन्यात आतापर्यंत सर्वात कमी तापमान ३२.६८ डिग्री सेल्सियस १९१७ मध्ये नोंदण्यात आले होते.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या कोणत्याही भागाला यंदा उन्हाळ्याचा फटका बसलेला नाही. पूर्ण देशभरात मे २०२१मध्ये १०७.९ मि.मी. पाऊस झाला. सरासरी ६२ मि.मी.पेक्षा हा पाऊस अधिक आहे. यापूर्वी १९९० मध्ये सर्वाधिक ११०.७ मि.मी. पाऊस झाला होता.
मे महिन्यात अबरी समुद्र आणि बंगालच्या खाडीत चक्रीवादळ आले. अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळानंतर बंगालच्या खाडीत यास चक्रीवादळ प्रकटले. या दोन्ही चक्रीवादळानंतर जोरदार पाऊस झाला. तर नुकसान अधिक झाले. हवामान विभागाने सांगितले की २०२१ मधील उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये उत्तर भारतात पाश्चात्य हवामानाचा प्रभाव अधिक राहिला.