रमाला : उत्तर प्रदेश ऊस फेडरेशनचे कार्यकारी संचालक रमांकांत पांडे यांनी साखर कारखान्यात आढळलेल्या त्रुटींबाबत उत्तम ग्रुपच्या अधिकाऱ्यांना फटकारले आहे. जर कारखान्यात काही बिघाड झाला तर ग्रुपला त्याची भरपाई करावी लागेल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना बजावले. कारखान्यातील बिघाडानंतर ऊस घेवून आलेल्या दोन शेतकऱ्यांना त्यांनी परत पाठवले.
अमर उजालामधील वृत्तानुसार, उत्तर प्रदेश ऊस फेडरेशनच्या कार्यकारी संचालकांनी रमाला सहकारी साखर कारखान्याची पाहणी केली. कारखान्यात ऊस घेवून येणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला समस्या भासू नये, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना बैठकीसाठी बेंच, पाण्याची व्यवस्था, विज दिव्यांची सुविधा आदींची योग्य पूर्तता करण्याचे निर्देश दिले. कार्यकारी संचालक पांडे यांनी वजन काट्यांचीही तपासणी केली. त्यावेळी हे काटे योग्य स्थितीत आढळले. ऊस वजन करण्यासाठी घेवून आलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तपासून तो स्वच्छ घेवून येण्याबाबत त्यांनी सूचना केली. कारखान्याला स्वच्छ ऊस घेवून आला तरच साखरेचा उतारा चांगला राहील, असे ते म्हणाले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक शादाब अस्लम यांनी सांगितले की, आतापर्यंत कारखान्याने १८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी अनिल कुमार भारती, अजय कुमार यादव, माजी उपसभापती रविंद्र मुखिया, सुमित पवार आदी उपस्थित होते.