नवी दिल्ली : चीनी मंडी
देशातील काही साखर कारखाने सरकारने जाहीर केलेल्या साखरेच्या निर्धारीत किमतीच्या (३१ रुपये किलो) खाली साखरेची विक्री करत असल्यामुळे देशातील सर्वच बाजारात मध्यम दर्जाच्या साखरेचे दर घसरले आहेत, देशातील साखर व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली.
साखर उद्योगातून सातत्याने होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करू तो ३१ रुपये किलो केला. फेब्रुवारी महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीच्या बाजारात साखरेचा दर ३० रुपये प्रति क्विंटल तर, कोल्हापूरच्या बाजारात २० रुपये प्रति क्विंटलने खाली आला आहे. मुंबईत पाच तर मुजफ्फरनगरमध्ये प्रति क्विंटल ४० रुपयांनी दर खाली आला आहे. या संदर्भात मुजफ्फरनगरमधील साखर व्यापारी सुधीर लांबा म्हणाले, ‘सरकार जोपर्यंत मार्च महिन्यासाठीचा कोटा २४.५ लाख टनावरून कमी करत नाही किंवा या कोट्यासाठीची मुदत मार्चच्या पुढे वाढवत नाही, तोपर्यंत साखरेच्या किमतींमध्ये सुधारणा दिसणार नाही.’
पश्चिम भारतात चांगल्या साखरेची उपलब्धता ही, साखरेच्या मागणीवर अवलंबून आहे, असे बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनने सांगितले. इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंज बाजारपेठेमध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे ‘मे’ कच्ची साखर १ टक्क्यांनी घसरून १२.२९ सेंट्स प्रति पाऊंडवर आल्या आहेत. गेल्या गुरुवारी मात्र, साखरेचे दर दोन आठवड्यांतील उच्चांकी पातळीवर म्हणजेच १२.६९ सेंट्स प्रति पाऊंडवर होते.
दरम्यान, साखरेचा बाजार हा ब्राझील आणि भारत या दोन प्रमुख साखर उत्पादक देशांमधील हवामानाच्या अंदाजावर अवलंबून आहे. येत्या काही महिन्यात ब्राझीलमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. तर, भारतातील मान्सून वर एल निनोचा प्रभाव दिसण्याची अपेक्षा असून, ऊस लागवण मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज आहे,’ अशी शक्यता सुकडेन फायनान्शिअल्सच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp