मेरठ : ऊस सर्व्हे नोंदणीतील अनियमिततेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींनंतर जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी झिंझाडपूर गावातील ऊस सर्व्हेच्या नोंदणीची पाहणी केली. यावेळी ३४ शेतकऱ्यांनी ६३ कॉलमची पाहणी केली. यामध्ये ८ शेतकऱ्यांच्या नोंदीबाबत अनियमितता दिसून आली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या शेतकऱ्यांनी याबाबतच्या बदलासाठी अर्ज केला आहे. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंतकुमार यांना शेतकऱ्यांनी सर्वच नोंदीची पडताळणी करावी असा आग्रह धरला. तरच ऊस तोडणीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने तयार करणे शक्य आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. ३१ ऑगस्टनंतर सुधारणांबाबत विचार केला जाणार नाही असे आधीच कृषी विभागाने बजावले आहे. यानंतर दुष्यंत कुमार म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपला ऊस बांधून घ्यावा. उभ्या ऊस पिकात युरियाचा वापर करू नये. आगामी काळातील ऊस लागणीविषयीही त्यांनी शेतकऱ्यांना सूचना केली. पाच फुटी पट्टा पद्धतीने ऊस लावण करून नैसर्गिक पद्धतीने शेती करावी असे आवाहन त्यांनी केले.