मेरठ : मवाना साखर कारखान्याने दोन कोटी ११ लाख ७१ हजार क्विंटल उसाचे गाळप करुन रविवारी रात्री गळीत हंगामाची समाप्ती केली. कारखान्याने हंगामात ७१३ कोटी रुपयांच्या उसाचे गाळप केले. यापैकी ५२३ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. हंगाम समाप्ताबरोबरच शेतकऱ्यांचे १९० कोटी रुपये कारखान्याकडे शिल्लक राहिले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना ऑगस्ट २०२३ पर्यंत दिले जातील असे कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मवाना साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सरुवात झाली होती. हंगामात कारखान्याने २ कोटी ११ लाख ७१ हजार क्विटंल उसाचे गाळाप केले. एकूण ७१३ कोटी रुपयांचा ऊस गाळप केला असल्याचे कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आतापर्यंत ५२३ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली असून १८ मार्चपर्यंतचे पैसे शेतकऱ्यांना पोहोचले आहेत. यंदा ३० लाख पोती साखर उत्पादन करण्यात आले आहे. अद्याप १० लाख पोती साखर शिल्लक आहे. त्याची बाजारातील किंमत ३४० कोटी रुपये आहे. त्यांच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना हळूहळू पैसे देण्यात येतील.