मुंबई : राज्यातील कामगारांसाठी ऊसतोड आखलेल्या आराखड्याची जिल्हास्तरावर अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी राज्य सरकारने बैठक आयोजित करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनी बुधवारी दिले. त्यानंतर यासंदर्भात लवकरच धाराशिव किंवा सोलापूर येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.
दरम्यान, दोन दिवसांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेनंतर बुधवारी ८ हजार ६०९ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेचा मुद्दा उचलून धरला.
याप्रश्नी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढील अधिवेशनाच्या अगोदर आपल्यासह गटनेते, विरोधी पक्षनेते यांची बैठक बीड, सोलापूर, कोल्हापूर येथे घेण्याची सूचना गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना केली. आचारसंहिता असली तरी धाराशिव किंवा सोलापूर जिल्ह्यात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.