कोल्हापूर : एफआरपी आणि त्यावर किती रक्कम देणार हे जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वच संघटनांनी दिला आहे. ऊसदरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सोमवारी (दि. 25) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूसभागृहात ही बैठक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी साखर कारखानदार आणि संघटना प्रतिनिधी यांची बैठक शासकीय विश्रामधामवर आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत निश्चित तोडगा न निघाल्याने ही बैठक फिस्कटली. आता स्वाभिमानी ने 23 रोजी जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद आयोजित केली आहे. त्या परिषदेत ऊसदराबाबत निर्णय होणार आहे.दरम्यान शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेऊन त्यात साखर कारखानदारांची बैठक घ्यावी.तसेच पूरग्रस्त भागातील ऊस तातडीने तोडण्यासाठीसूचना करावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस.एन. जाधव यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखरकारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आलीआहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.