मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस गाळपाच्या मदतीसाठी बैठक

पुणे : मराठवाड्यात यंदाच्या अतिरिक्त ऊस गाळपाबाबत प्रशासन आणि सरकारने विचारविनिमय सुरू केला आहे. याबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि राज्यातील कारखाना प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यावेळी मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाचे गाळप आणि त्याच्या मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. २०१०-११ या हंगामातही अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी कार्यक्षेत्राबाहेरील ५० किमीमधील उसाला ३ रुपये प्रती टन अनुदान देण्यात आले होते. या हंगामातही कारखान्यांनी अशाच पद्धतीने मदत मागितली आहे.

देशाच्या बहुतांश भागाप्रमाणे राज्यातही उन्हाचा तडाखा बसत आहे. तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कडक उन्हामुळे ऊस पिकावर परिणाम झाल्याची तक्रार केली आहे. मराठवाड्यातील समस्या गंभीर आहे. काही कारखान्यांनी आर्थिक अडचणींमुळे आपला हंगाम उशीरा सुरू केला आहे. या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होईल.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिशएशननेही (विस्मा) सरकारकडे अतिरिक्त ऊस गाळपासाठी मदत मागितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here