शिलाँग : बीएसएफ मेघालयच्या जवानांनी ६ जानेवारी २०२५ रोजी तस्करीचा प्रयत्न हाणून पाडताना ३४.१५ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. यावस्तूंमध्ये साखर, मद्य, लसूण, कॉस्मेटिक्स, औषधे आदींचा समावेश होता. हा वस्तुंची अवैध तस्करी बांगलादेशमध्ये केली जात होती.
गोपनीय माहितीच्या आधारे बीएसएफ मेघालयच्या जवानांनी पश्चिम जैतिया हिल्समधील मुक्तापूर आणि लिंगघाट या गावाजवळ खास अभियान राबवले. या अभियानादरम्यान, जवानांनी तस्करीचे साहित्य घेऊन सीमेच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात व्यक्तींना पाहिले. हटकल्यावर त्या व्यक्ती जंगलाच्या दिशेने पळून गेल्या. परिसराची तपासणी केल्यावर लपवून ठेवलेले साहित्य सापडले. ते जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य पुढील तपासणी आणि कायदेशीर कारवाईसाठी सीमा शुल्क विभागाकडे सुपुर्द करण्यात आले आहे.