राजारामबापू साखर कारखान्याच्या सभासदांना ११७ किलो साखर मिळणार : अध्यक्ष प्रतीक पाटील यांची माहिती

सांगली : राजारामबापू कारखाना सभासदांना दरमहा ७ किलो व किलो अशी एकूण ९१ किलो साखर देत आहे. मात्र दि.१ ऑगस्ट २०२४ पासून कारखान्याच्या सभासदांना दरमहा ९ किलो व दिवाळीसाठी ९ किलो अशी एकूण ११७ किलो साखर दिली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. तसेच कारखान्याकडील रुपांतरित ठेव व परत केलेल्या विस्तार वाढ व सहवीज निर्मिती प्रकल्प ठेव रुपये १४७ चे व्याज १५ ऑक्टोबरला सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, कारखान्याने कारखाना विस्तारवाढ व सहवीज प्रकल्पास सन २०१४- २०१५ मध्ये प्रतिटनास १४७ रुपये ठेव घेतली होती. ती ठेव ऊस उत्पादकांना परत केली आहे. मात्र या ठेवींवरील १ जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतचे व्याज १५ ऑक्टोबरला सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी. एम. पाटील, संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here