हवामान विभागाच्या आकडेवारीने वाढवली चिंता, देशाील २० राज्यांत प्री -मान्सून उदासिन

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने प्री-मान्सून पावसाबाबतची आकडेवारी जारी केली आहे. आयएमडीच्या या आकडेवारीने लोकांची चिंता वाढवली आहे. १ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत वीस राज्यांमध्ये कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या राज्यांत पाण्याची समस्या आहे. खास करून खरीप पिकांच्या सिंचनावेळी पाणी टंचाई निर्माण होऊ सकते. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत पावसाच्या कमतरतेसोबत उष्णतेच्या लाटेने वातावरण बदलले आहे. त्यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. भाजीपाला, फळांचे दर वाढले आहेत. प्री-मान्सून कमी झाल्याने पावसाची कमरतरा, ऊस, कापूस यांसारख्या पिकांच्या सिंचना अडथळे येऊ शकतात.

हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी सांगितले की, अनेक नद्यांच्या खोऱ्यात या पूर्ण कालावधीत पाऊस झआलेला नाही. तर अनेक राज्यांत अतिशय कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्यावर ताण येऊ शकतो. भारतात वार्षिक प्री मान्सून ११ टक्के असते. आयएमडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या नदी खोऱ्यात कमी पाऊस अथवा पाऊस झाला नसेल तर आपसापच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी धरणांवर अधिक दबाव वाढेल. २४ एप्रिलपर्यंत आयएमडीकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांच्या खोऱ्यात कमी पाऊस नोंदवला गेला आहे. राज्यात ६० ते १०० टक्क्यांची कमतरता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here