दक्षिण भारतात पावसाचा हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सामान्य ते अधिक पाऊस होण्याचे अनुमान वर्तवले आहे. याकाळात दीर्घ कालावधीत १२२ टक्के पाऊस होऊ शकतो. आयएमडीने सांगितले की आंध्रच्या किनारपट्टीचा भाग, रायलसीमा, तामीळनाडू, केरळ, पुद्दूचेरी आणि दक्षिण कर्नाटकात नोव्हेंबरमध्ये पाऊस सामान्यपेक्षा अधिक होऊ शकतो.
१९६१ ते २०१० या कालावधीतील आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ११७.४६ मिमीआहे. तर २५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पूर्वोत्तर मान्सूनमुळे केरळमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात ५८९.९ मिमी पाऊस झाला. १९०१ नंतर हा महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, दक्षिण भारतात विशेषतः केरळमध्ये ११ नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू राहील. देशात या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पावसाच्या १२५ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षात या सर्वाधिक आहेत. दक्षिण – पश्चिम मान्सून उशीरा परतल्याने आणि हवेचा सामान्यपेक्षा अधिक दाब या बाबी यास कारणीभूत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here