अनलॉक 4: मेट्रो ट्रेन 1 सप्टेंबरपासून सुरु होण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकार अनलॉक 4 च्या अंतर्गत 1 सप्टेंबर पासून मेट्रो ट्रेन ची सेवा सुरु करण्यास परवानगी देवू शकते. पण राज्यसरकार यावर अंतिम निर्णय त्या त्या राज्यातील कोरोनाच्या स्थितीनुसार घेतील. याशिवाय आता लगेचच शाळा किंवा कॉलेज सुरु होणार नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितले की, चित्रपटगृहे देखील इतक्यात खुली केली जाणार नाहीत. सरकार या आठवड्याच्या शेवटपर्यंत अनलॉक 4 चे दिशा निर्देश जारी करु शकते.

अधिक़ार्‍यांनी सांगितले की, अनलॉक 4 मध्ये आतापर्यंत बंद ठेवण्यात आलेले बार ही उघडण्याची तयारी आहे. तिथे बसून दारु पिण्याची परवानगी असणार नाही, त्याला टेक अवे प्रणालीप्रमाणे चालवण्याची सूट दिली जावू शकते. अधिक़ार्‍यांनी मिडिया रिपोर्टला माहिती देताना सांगितले की, शाळा कॉलेजही लगेच खुली केली जाणार नाहीत. परंतु विद्यापीठे, आयआयटी आणि आयआयएमसारख्या उच्च शैक्षणिक संस्था उघडण्याबाबत गंभीर विचार सुरू आहे. सध्या यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर चित्रपटगृहांना उघडणे हे मोठे आव्हान आहे कारण सोशल डिस्टसिंग चे पालन करणे फिल्म निर्माते आणि थिएटर मालकांसाठी महाग पडू शकते. त्यामुळेच चित्रपटगृहे इतक्यात सुरु करता येणार नाहीत.

सरकार अनलॉक च्या दिशानिर्देशांमध्ये यावेळी केवळ प्रतिबंधित हालचालींची माहिती देईल. याशिवाय इतर सुरु करण्याची सूट असेल. यावर शेवटचा निर्णय राज्यांना घ्यावा लागेल. राज्य सरकार आपल्या राज्याच्या अवस्थेच्या समीक्षेनंतर यावर योग्य तो निर्णय घेईल. कोरोना मुळे मेट्रो रेल्वे सेवा मार्च मद्ये लॉकडाउन लागू झाल्याने बंद होती.

आतापर्यंत देशामध्ये ज्या हालचाली प्रतिबंधीत होत्या, त्यापैकी मेट्रो रेल्वे सेवा, चित्रपट गृहे, मॉल, मनोरंजक पार्क, थिएटर, बार, सभागृह आणि याप्रकारे इतर जागांवर प्रतिबंध लागू आहेत. याशिवाय सामजिक, राजनितिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आयोजन आणि समारंभांना पुढच्या 1 महिन्यापर्यंत प्रतिबंधीत ठेवण्यात आले आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here