मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये ऑक्टोबर २०२० – सप्टेंबर २०२१ या कालावधीतील साखर उत्पादन आतापर्यंत ५.६ मिलियन टनापर्यंत पोहोचले आहे. आधीच्या अपेक्षित अंदाजापेक्षा साखर उत्पादन ५,००,००० टनाने कमी असल्याची माहिती धान्य व्यापारी आणि पुरवठादार सेवा यंत्रणा जारनिकोने दिली.
जारनिकोने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, २०१९-२० या कालावधीतील दुष्काळाचे परिणाम यंदा दिसून येत आहेत. त्यामुळे उसाचा पुरवठा कमी झाला आहे. अमेरिकेला साखर आयात करणारा मेक्सिको हा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. उत्पादन कमी झाल्याने इतर देशांनाही साखर निर्यात खूपच कमी होईल. मेक्सिकोला आता देशांतर्गत मागणी पूर्ण करणे आणि अमेरिकेला आपला ८,८०,००० टनांचा पूर्ण कोटा पाठविणे यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जारनिकोच्या अहवालानुसार मेक्सिकोची साखर निर्यात १.१५ मिलियन टन होऊ शकेल. २०१४ नंतर ती सर्वात कमी राहील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link