मिशिगन(अमेरिका): जगाची सुपर पॉवर अमेरिका ही कोरोनामुळे संकटग्रस्त आहे. या गंभीर महामारीमुळे अमेरिकेतील प्रत्येक दिवशी अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत, तर हजारो लोक कोरोनाग्रस्त होत आहेत. या महामारीशी लढण्यासाठी आता सरकार सह खाजगी संस्थाही पुढे आल्या आहेत. मिशिगन शुगरनेही COVID -19 शी लढण्यासाठी पुढे आले आहे. ते व्यक्तीगत सुरक्षा उपकरण विविध रुग्णालयांना देऊन त्यांना सहकार्य करत आहे. गेल्या शुक्रवारी मिशीगन शुगर ने 80- N95 मास्क, 370 – सेफ्टी ग्लासेस आणि 550 – हैण्ड ग्लोव्ज Scheurer रुग्णालयाला दिले.
याशिवाय मिशीगन शुगर कडून अनेक रुग्णालयांसाठी आवश्यक सुरक्षा साधने तयार केली आहेत.
मिशिगन शुगर चे संचालक रॉब क्लार्क म्हणाले की, मिशिगन शुगर, इतर सर्व खाद्य निर्मात्यांप्रमाणे होमलैंड सिक्योरिटी विभाग द्वारा या COVID-19 महामारी च्या दरम्यान एका महत्वपूर्ण उद्योगाच्या रुपात सूचीबध्द आहे, यासाठी येथील कर्मचारी अजूनही काम करत आहेत. साधारणपणे आतापर्यंत काम संपते, पण 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे उशिरा ऊसतोडणी सुरु झाल्यामुळे, 9 एप्रिलपर्यंत काम चालू राहील. मिशीगन शुगरच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला COVID-19 मुळे बाहेर जाऊ दिले नाही, आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांबरोबर सतत संपर्कात आहोत.