अहमदनगर : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्यात आगामी हंगामासाठी कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी ढाकणे म्हणाले कि, आगामी काळ ऊस उत्पादनाच्या बाबतीत कठीण आहे. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
ढाकणे म्हणाले कि, शेतकरी व कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय संघर्षातून ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी या कारखान्याची उभारणी केली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश घनवट, माधव काटे, संदीप घोडके, सीताराम बोरुडे, सुरेश होळकर, आयुब शेख, प्रदीप देशमुख, सुरेश पवार, रमेश गर्जे आदिसह अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.