साखरेची MSP वाढवून ₹३,७५०/क्विंटल करण्याची कारखानदारांची मागणी

पुणे : राज्यातील सर्व सहकारी साखर कारखानदारांची शिखर संस्था, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज फेडरेशनने कृषी उत्पादन खर्च आणि मूल् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि साखरेचा किमान विक्री दर (MSP) प्रती क्विंटल ३,७५० रुपयांपर्यंत वाढवावा, अशी मागणी करणारे पत्र सरकारला लिहिले आहे.

साखर उद्योगाचा कच्चा माल असलेल्या उसाच्या योग्य आणि लाभदायी दरात (एफआरपी) वाढ झाल्यामुळे सहकारी साखर कारखानदारांची चिंता वाढली आहे. CACP च्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने उसाची एफआरपी वाढवून ३,१५० रुपये प्रती टन केली आहे. यासोबतच CACP ने साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचीही शिफारस केली आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले की, फक्त CACP नव्हे तर साखर दर नियंत्रण अधिनियमानेही केंद्र सरकारला साखर विक्री दरात बदल करण्याचा आदेश दिला आहे.
पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत साखरेची एमएसपी ३,१०० रुपये प्रती क्विंटल आहे. साखर कारखानदारांना यापेक्षा अधिक खर्च येत आहे. गेल्या पाच वर्षात एफआरपी २९०० रुपयांवरून वाढून ३१५० रुपये प्रती टन करण्यात आली. ते म्हणाले की अंतिम उत्पादन असलेल्या साखरेची किंमत साखर कारखानदारांकडून त्याच्या कच्च्या मालासाठी, उसासाठी द्याव्या लागणाऱ्या किंमतीपेक्षा कमी आहे.

फेडरेशनने व्यवस्थापन, वेतन, सध्याची कर्जे, देय व्याज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंतिम उत्पादन विक्री करण्यापूर्वी एफआरपीवर होणाऱ्या खर्चाच्या आधारावर साखरेचा एमएसपी प्रती टन ३७५० रुपये करण्याची सूचना केली आहे. पाटील म्हणाले की, जर साखरेचा एमएसपी वाढवला तर साखर कारखाने एकरकमी एफआरपी देऊ शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here