मुंबई : गेल्या तीन वर्षामुळे झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली असून महाराष्ट्राच्या २०२१-२२ या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. राज्यात २०२१-२२ या हंगामात ११.२ मिलियन टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. हे देशातील सर्वाधिक उत्पादन असेल. महाराष्ट्राचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ११.१ मिलियन टन साखर उत्पादनाची अपेक्षा आहे.
हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र नेहमीच साखर उत्पादनात उत्तर प्रदेशपेक्षा आघाडीवर होता. मात्र २०१६-१७ नंतर उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला पिछाडीवर टाकले. त्याला विविध कारणे होती. मात्र, यंदा महाराष्ट्र साखर उत्पादनात युपीपेक्षा पुढे जाईल अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत साखर आयुक्त कार्यालयाने बंपर साखर उत्पादनाची शक्यता वर्तविली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार ऊस क्षेत्र २०२०-२१ मध्ये १.१४ मिलियन हेक्टरवरुन वाढून १.२३ मिलियन हेक्टर झाले आहे. त्यामुळे १०९६ लाख टनाच्या अनुमानीत गळीतापेक्षा अधिक ११.२ मिलियन टन इतके उत्पादन होईल. २०१८-१९ ध्ये महाराष्ट्रा आतापर्यंत सर्वाधिक १०.७२ मिलिटन टन उत्पादन नोंदवले आहे. तर ऊस लागण क्षेत्र १.१६ मिलियन हेक्टर होते. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात १९० पेक्षा अधिक साखर कारखाने गाळप हंगामात सहभाग घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे ऐतिहासिक सर्वाधिक उत्पादनासह महाराष्ट्र साखर उत्पादनात उत्तर प्रदेशच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link