कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 2019-2020 चा साखर हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोचला आहे. कोल्हापूर क्षेत्रामध्ये साखर रिकवरीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. आतापर्यंत सरासरी साखर रिकवरी 11.99 टक्के आहे. कोल्हापूर विभागात 19 फेब्रुवारीपर्यंत 142.29 लाख मेट्रीक टन ऊस गाळप झाले, आणि 11.99 साखर रिकवरी च्या हिशेबाप्रमाणे 170.65 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
साखर रिकवरीमध्ये सांगली जिल्ह्यातील निनाईदेवी साखर कारखाना 12.79 टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा साखर कारखाना 12.72 रिकवरीसह दुसर्या स्थानावर आहे. सरसरी रिकवरीमध्ये खाजगी साखर कारखाने सहकारी साखर कारखान्यांपेक्षा पुढे आहेत.
साखर कारखान्यांचा हंगाम यावर्षी डिसेंबर पासून खूपच कमी वेगाने सुरु झाला. अतिवृष्टी आणि पुरामुळे सुरुवातीला ऊस गाळपामध्ये अडचणी आल्या. जानेवारीपासून गाळपाला वेग आला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.