साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनाचे प्रयत्न सुरू

बिजनौर : चीनी मंडी

बिजनौरमध्ये साखर कारखान्यांनी ऊसापासून साखर वगळता अन्य उप पदार्थांच्या उत्पादनांची निर्मिती करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविली आहे. तर आणखी एका साखर कारखान्याने आसवनीची उत्पादन क्षमता वाढवली आहे. धामपूर साखर कारखान्याने इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यामध्ये एकूण नऊ साखर कारखाने आहेत. यापैकी फक्त पाच साखर कारखान्यांमध्ये आसवनी आणि डिस्टिलरी प्लांन्ट आहेत. केंद्र सरकारने ऊसापासून साखरेसह अन्य उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवले आहे. ऊसापासून तयार झालेले हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. सद्यस्थितीत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची मर्यादा आहे. साखर कारखान्यांकडून इथेनॉलचेही उत्पादन व्हावे, पेट्रोलमध्ये दहा टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जावे, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आसवनीची उत्पादन क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील धामापूर, स्योहारा, बरकातपूर, बुंदकी व नजीबाबाद या साखर कारखान्यांमध्ये आसवनी आहेत. धामापूर साखर कारखान्याने आपल्या आसवनीची रोजची उत्पादन क्षमता २०० किलोलीटरवरून २५० किलोलीटर केली आहे. बरकातपूर साखर कारखान्याने ७५ वरून १५० किलोलीटर प्रतिदिन क्षमता वाढवली आहे. याशिवाय स्योहारा साखर कारखान्याची आसवनी क्षमता १००, बुंदकी सारखान्याची ९० तर, नजीबाबादची ४० किलोलीटर
प्रतिदिन आहे. बुंदकी साखर कारखाना आपली आसवनी उत्पादन क्षमता १३० किलोलीटर प्रतिदिन करणार आहे.
जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखाने इतर उपपदार्थांच्या निर्मितीवर भर देत आहेत. इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आणि साखर कारखाने या दोन्हींसाठी ते फायदेशीर ठरेल.

असा होईल फायदा
इथेनॉल हे एक प्रकारचे इंधन आहे, ज्याला पेट्रोलमध्ये मिसळता येते. पेट्रोल आणि इथेनॉल मिक्स केल्याने कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. सद्यस्थितीत पेट्रोलमध्ये दहा टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाचे संकट दूर होईल. तेलावरील होणारी आयात कमी होऊन परकीय चलन वाचविण्यासाठीही हे फायदेशीर ठरणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here