आता ज्युटच्या पोत्यांमध्ये कारखाने करणार साखरेचे पॅकिंग

सहारनपूर : ज्यूटचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी मिळणार आहे. आता साखर कारखाने साखरेचे पॅकिंग ज्युटच्या पोत्यामध्ये करतील. यावर ऊस विभाग नियंत्रण ठेवणार आहे. ठराविक प्रमाणात साखरेचे पॅकिंग ज्युटच्या पोत्यांमध्ये केले जाईल. यासाठी सरकारने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आगामी गळीत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून साखरेचे पॅकिंग ज्युटमध्ये केले जात असल्याचे दिसून येईल. विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगामात साखर कारखाने आपल्या एकूण उत्पादनाच्या २० टक्के साखर ज्युटच्या पोत्यांमध्ये करतील. तर उर्वरीत ८० टक्के साखरेचे पॅकिंग प्लास्टिकच्या पोत्यांमध्येच होईल.

साखर कारखान्यांना ज्यूटची पोती होलसेलर्स, कंपन्यांकडून निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून खरेदी करावी लागतील. साखर पॅकिंगसाठी ५० किलोच्या पोत्याचा वापर केला जाईल. यावर निरीक्षण ऊस विभागाच्यावतीने ठेवले जाणार आहे. गेल्या गळीत हंगामात जिल्ह्यात उच्चांकी ५३.०६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ज्युट बॅग वापरावर अधिक भर देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here