बेळगावी : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची ऊसाची थकबाकी भागवलेली नाही. कर्नाटकचे साखर मंत्री सी.टी. रवी यांनी यांनी साखर कारखानदारांनी ही थकबाकी लवकरात लवकर भागवावी, अशी विनंती कारखानदारांना केली आहे.
मंत्री म्हणाले, कारखानदारांनी प्रलंबित थकबाकी कोणत्याही विलंबाशिवाय द्यावी . तसेच ऊस उत्पादकांना ऊसाचे पैसे आधी कसे मिळतील याबाबत विचार करावा असेही सुचवले. ऊस दराबाबत कारखानदारांशी लेखी करार करावा असेही त्यांनी सांगितले.
या लेखी करारामुळे, कारखानदार अणि शेतकरी यांच्यात वाद झाल्यास सरकारला हस्तक्षेप करण्यास मदत होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.