लखनऊ(उत्तरप्रदेश): उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व साखर कारखान्याच्या मालकांना राज्यातील सर्व कार्यालये आणि पोलीस ठाण्यांसह सार्वजनिक कार्यालयांनाही सैनिटाइज करण्याची विनंती केली आहे. राणा म्हणाले, लॉकडाउन दरम्यान यामधील परिसरांमध्ये दूसऱ्या देशातील किंवा जिल्ह्यातून आलेल्या लोकांना ठेवण्यात येत आहे.
ऊस विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, प्रदेेशचे साखर उद्योग एवं ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी राज्यातील सर्व कारखानदारांना अशी विनंती केली आहे की, राज्यातील सर्वच कलेक्ट्रेट, सामुदायिक स्वास्थ्य केंद्र, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, तहसीलदार कार्यालय तसेच विकासखंड भवन आणि पुलिस ठाणी यांना तातडीने सैनिटाइज करण्यासाठी कार्यक्रम सुरु करा.
ते म्हणाले, साखर कारखानदारांचे हे पाऊल कोरोना चे संक्रमण रोखण्यात महत्वाचे ठरेलच शिवाय ही मानवतेची आणि माणूसकीचीही मोठी सेवा आहे. त्यामुळे ही सामाजिक जबाबदारी निभवणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.