हंगेरीला Global Biofuels Alliance मध्ये सामील होण्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे निमंत्रण

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हंगेरीला ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्समध्ये (Global Biofuels Alliance) सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. मंत्री पुरी यांनी सोशल माडिया प्लॅटफॉर्म X वरील आपल्या पोस्टमधून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “हंगेरीचे परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार मंत्री महामहिम पीटर सिज्जार्टो यांचे स्वागत करताना खूप आनंद झाला. 2022 मध्ये #ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मी बुडापेस्टमध्ये असताना मला मिळालेल्या मदतीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानले.

अनेक भारतीय विद्यार्थी हंगेरीमध्ये त्यांचे शिक्षण सुरू ठेवत आहेत, हे जाणून मला खूप आनंद झाला. आमच्या चर्चेदरम्यान, मी हंगेरीला जागतिक जैवइंधन अलायन्समध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे, जी भारताच्या ऐतिहासिक जी२० अध्यक्षतेच्या काळात पंतप्रधान @narendramodiJi यांनी सुरू केली होती.

नवी दिल्ली येथे जी२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली Global Biofuels Alliance वेगवान होत आहे आणि जगभरातील उद्योग नेते, उद्योजकांना प्रेरणा देत आहे. जीबीए हा सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योगांचे एक संघ आहे, जो जी२० च्या अध्यक्षतेदरम्यान भारताने पुढाकार घेऊन सुरू केला आहे. याचे मुख्य उद्दिष्ट जैवइंधनाच्या विकासाला आणि उपयोजनांना चालना देण्यासाठी जैवइंधनाचे सर्वात महत्त्वाचे ग्राहक आणि उत्पादक यांना एकत्र आणणे असे आहे.

Global Biofuels Allianceचे उद्दिष्ट मागणी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणास प्रोत्साहन देणे आणि जैवइंधनाच्या उत्पादनात व्यापार वाढवणे असे आहे. भारताने इंधनावरील आयात अवलंबित्व कमी करण्याचा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा मार्ग म्हणून याकडे पाहिले आहे. भारताची संकल्पना असलेल्या या युतीचे संस्थापक सदस्य म्हणून अमेरिका आणि ब्राझील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here