जसपूर : ऊस राज्यमंत्री यतीश्वरानंद सरस्वती यांनी नादेही साखर कारखान्याची अचानक पाहणी केली. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
रविवारी ऊस राज्यमंत्र्यांनी नादेही साखर कारखान्याला पोहोचून कारखाना कार्यस्थळ, साखरेच्या गोदामांतील साखर, कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यांना देखभालीविषयीची सूचना केली. आगामी गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्याची सूचना केली.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊन अडचणी सोडविण्याचे, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि किटकनाशके वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. यावेळी तेथे राज्यमंत्री मुकेश कुमार, कारखान्याचे कार्यकारी अधिकारी अनिल चन्याल, डी.के. श्रीवास्तव, खेमानंद आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link