नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी एक जून २०२३ रोजी गेलच्या कॉर्पोरेट कार्यालयाला भेट दिली.
गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार गुप्ता यांनी मंत्री तेली यांचे स्वागत केले. यावेळी मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक आयुष गुप्ता हे देखील उपस्थित होते. मंत्री तेली यांनी वरिष्ठ व्यवस्थापनाशी संवाद साधला. बैठकीत गेलच्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. संवादा दरम्यान मंत्र्यांनी गेलच्या विविध व्यावसायिक उपक्रमांबाबत उत्सुकता दाखवली.