लाहौर: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खाद्य मंत्री समीउल्लाह चौधरी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्त आणि उप निदेशकांना आपापल्या क्षेत्रातील साखर कारखान्यांचा दौरा, तसेच ऊस गाळपासंबंधी आवश्यक बैठका घेण्या संदर्भात निर्देश दिले आहेत.
ते ऊस गाळप हंगाम 2019-20 च्या व्यवस्थेबाबत सर्वेक्षणासाठी शुक्रवारी झालेल्या कैबीनेट समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या अधिकारांच्या रक्षणाबरोबरच त्यांना कुठल्याही शोषणापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
त्यांनी निर्देश दिले की, उपायुक्त आणि उप निदेशक यांनी आपापल्या परिसरातील कारखान्यांचा दौरा करून आवश्यक ते सर्वेक्षण करावे. त्यांनी कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी करणाऱ्या उद्योग विभागाच्या पथकांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची पूर्ण किंमत मिळावी, यासाठी त्यांना विशेष सुविधा देण्यात आल्या. बैठकीत ऊस गाळपा संदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.
यापूर्वी, पंजाबच्या ऊस आयुक्तांनी ऊस गाळपाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी उद्योग मंत्री मियां असलम इकबाल, सिंचाई मंत्री मोहसिन लेघारी, खाद्य सचिव, पंजाब के गन्ना आयुक्त, डीजी (उद्योग) और डीसी (लाहौर) आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.