काशीपूर, उत्तराखंड: समाज कल्याण मंत्री यशपाल आर्य यांनी साखर कारखान्यात पोचून कामगारांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निराकरण करण्याचा विश्वास दिला. मंत्री म्हणाले की, श्रमिकांना कोणत्याही प्रकारची कोणतीही समस्या येवू दिली जाणार नाही. तर श्रमिक यूनियन यांनी आर्य यांना 14 सूत्रीय पत्र दिले. शुक्रवारी समाज कल्याण मंत्री व क्षेत्रीय आमदार यशपाल आर्य साखर कारखान्यात पोचले. यशपाल आर्य यांनी सांगितले की, राज्या बरोबर बाजपूर ही त्यांची जबाबदारी आहे आणि कोणत्याही नागरीकाला कोणतीही अडचण होवू दिली जाणार नाही. साखर कारखान्यामधील पाच यूनियन च्या पदाधिकार्यांनी एक संयुक्त मागणी पत्र मंत्री आर्य यांना दिले. यामध्ये श्रमिकांना या समस्यांचे निराकरण करण्याचे अश्वासन देण्याबरोबरच उच्चाधिकार्यांना अवगतही केले. यावेळी वीरेंद्र सिंह, गेंदराज सिंह, करन सिंह, यशपाल सिंह, अमला यादव, अनिल सिंह, डीके जोशी, राहुल वर्मा, राजकुमार, मुकुंद शुक्ला, अभिषेक तिवारी आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.